गोंडवाना गणतंत्र पार्टीची सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा व बैठक संपन्न

0
183
नागपूर १४ : दि. 13 जुलै रोजी रविवारी गोंडवाना विकास मंडळ तुकडोजी पुतळा नागपूर स्थायी गोंडवाना गणतंत्र पार्टीची सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा व बैठक पार पाडली. भिमालपेन देवस्थान सेवादल नगर  समितीच्या माध्यमातून भिमालपेन देवस्थान सेवादल नगर या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदर्शनात्म कार्यक्रम, महिला सक्षमिकरण कार्यक्रमाचे आयोजन करणे. तसेच आपले आराध्य दैवत कुँवारा भिमालपेन देवस्थानाचे सुशोभिकरण करणे. जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरातील स्थानिक लोकसंख्येच्या हक्कांचे जागृती आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. त्या उद्देशाने 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त चर्चा करून सर्वानुमते कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. महिला सक्षमीकरण एक महत्त्वाचा विषय आहे. महिलांना सक्षम करणे म्हणजे समाजाला सक्षम करणे आहे. सरकारने आणि समाजाने महिला सक्षमीकरणासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे म्हणजे त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना व्यवसाय आणि उद्योजकता क्षेत्रात संधी देणे. याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गोंडवाणा गणतंत्र पार्टी च्या बळकटीकरण वर चर्चासत्र संपन्न झाली. यावेळी दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर गोंगपा, गंगाताई टेकाम जिल्हाध्यक्षा नागपूर कृष्णा सरोते उपाध्यक्ष नागपूर शहर गोंगपा, प्रिती पंधराम उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, विजय आत्राम महामंत्री नागपूर शहर गोंगपा, प्रविण मडावी जिल्हाध्यक्ष नागपूर जिल्हा,  शितल ताई मडावी उपाध्यक्ष नागपूर शहर गोंगपा, मुक्ताताई गेडाम वार्ड अध्यक्ष गोंगपा, लता ताई आत्राम, किर्तीताई युवनाते, प्रतिमाताई वरठे, सुलभाताई मसराम, सुषमा ताई दडांजे, सुलभा मसराम रेखा कन्नाके रामभाऊ भलावी, विजय भलावी, शंकरराव मडावी, मोतिराम सिरसाम, मनोज उईके, मुकुंदा मडावी, भाग्यश्री उईके व आदि अनेक समस्त संख्येने उपस्थित होते. संचालन विजयजी आत्राम व आभार किर्तीताई युवनाते यांनी मानले.