नागपूर :- माजी केंद्रीय कृषीमंत्री व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या फोटोस सहाय्यक महसूल अधिकारी अनिल हाडके यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



