– दापोरी येथील शेकडो मुला मुलींना योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, लाठीकाठीचे प्रशिक्षण !
मोर्शी :– मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत श्रीमद् भागवत ग्रामगीता तत्त्वचिंतन सोहळा दापोरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव तसेच सर्व संत स्मृतिदिन साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने दहा ते अठरा वर्षा पर्यंतच्या दापोरी गावातील मुला मुलींचे सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये शिकवण्यात येणारे विषय योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, लाठीकाठी, कराटे मानवी मनोरे, हल्लाबोल, लाटीबंधिष इत्यादी मैदानी व मर्दानी खेळ शिकवल्या जात आहे. 

ग्रामगीतचार्य ह .भ. प. रायजीप्रभू शेलोटकर महाराज यांनी भागवत कथेचे वर्णन करत असताना म्हटले जेवढी शास्त्राची गरज आहे तेवढीच शास्त्राची गरज आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीते मध्ये वर्णन करतांना आजचे छान छान बाल ! उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील ! देशाचा पांग फेडतिल ! ऊतो मत्तम गुणांनी !! अश़े प्रतिपादन केले. शेलोटकर महाराजांनी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शेकडो गावांमध्ये श्रीमद् भागवत कथेच्या आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून पन्नास हजार मुलांना सुसंस्काराचे धडे दिले त्यांना शस्त्र आणि शास्त्रचे ज्ञान दिले आज ती काळाची गरज असल्याचे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. या महोत्सवामध्ये 29 डिसेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता याच शिबिरातील मुलांचा मातृ-पितृ पूजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. असे विधायक कार्यक्रम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्ताने दापोरी गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.



