नागपूर, ता. १६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.15) रोजी शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 44,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 800/- रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 11,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून रू.1,000/- चे दंड वसुल करण्यात आले.रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/ जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रू.1,000/- चे दंड वसुल करण्यात आले.वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणाची नोंद करून रू.2,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून रू.1000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून रु.16,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध धरमपेठ झोन अंतर्गत मे.ऑर्किड इंफ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- रूपयांची दंड वसूली करण्यात आली. हनुमान नगर झोन अंतर्गत शारूक शेख यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत सचिन चौहान यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले.गांधीबाग झोन अंतर्गत मे.अरूणा स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत निलेश वामनरावजी यांनी चेंबर तोडल्यामुळे रू.5,000/-चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. व्हाईट हाउस व मे.ट्रु व्हॅल्यु प्रोजेक्ट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 10,000/- या प्रमाणे रू.20,000/- रूपयांची दंड वसूली करण्यात आली.उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.




