खापा :- खापा पोलीसांना हद्दपार इसम नामे दादाराव सुभाष हरकरे, वय ३८ वर्ष, रा. कोथुळणा ता. सावनेर हा खापा येथे मिळुन आला. खापा पोलीसांनी हद्दपार आरोपी दादाराव सुभाष हरकरे याला नागपुर जिल्हयात येण्याच्या परवानगी बाबत विचारणा केली असता नमुद आरोपीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून नागपुर जिल्हयात प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन खापा येथे कलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हे नोंद केला आहे.



