spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री गजानन महाराज पालखी यात्रेचे कन्हान, कांद्री परिसरात जल्लोषात स्वागत

कन्हान :- श्री संत गजानन महाराज सेवा समिती, तीन खंबा चौक नागपुर द्वारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचे कन्हान, कांद्री शहरात फुलाच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करून पाणी, चाय, काफी, बिस्किट, फराळी पॉकेट चे भाविकांना वितरण करण्यात आले.

शनिवार (दि.३) जानेवारी ला सकाळी ५ वाजता श्रीची आरती पुजा अर्चना करुन श्री हरिहर गजानन मंदीर टीमकी तीन खंबा चौक नागपुर येथुन प्रस्थान होऊन गजानन महाराज मंदिर प्रेमनगर,भवानी माता मंदीर कळमना मार्गे कामठी येथे आगमन झाले. मोदी राम मंदीर येथे कामठी वासियां व्दारे दुपारचे जेवण आणि त्यानंतर प्रवचन व अल्प विश्रांती घेऊन कन्हान च्या दिशेने रवाना झाली. महामार्गाने जुना आडा पुल कन्हान नदी पुलावर पोहचली असता सनातनी धार्मिक संस्था कन्हान व्दारे फुलाच्या वर्षाव आणि फळ वितरण करुन जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी शुभम बावनकर, विनोद यादव, आयुष संतापे, हिमांशु सावरकर, सुर्या संपाते, आर्यन संतापे, वेंदात बावनकुळे आदि नागरिक उपस्थित होते. तदंतर काली मात सत्रापुर रोड कन्हान येथे आगमण होताच मॉ काली माता सेवा ट्रस्ट सत्रापुर कन्हान द्वारे भव्य स्वाग त करून किर्तन व नंतर महाप्रसाद वितरण करून पालखी यात्रेकरू चा मुक्काम करण्यात आला.

रविवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ६ वाजता काली माता मंदिरात पुजा पाठ करुन पालखी प्रस्थान होऊन शहरातील राष्ट्रीय महामार्गाने गणेश नगर वासी , पांधन रोड हनुमान, गजानन मंदिर तिवाडे ले-आऊट येथुन पांधन रोड ने कन्हान नगर प्रदक्षिणा करित श्री गजानन सॉ मिल, काकडे निवास येथे चाय नास्ता व विसावा करून पुढे प्रस्थान केल्यावर तारसा रोड चौक , रायनगर येथे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले.

गजानन महाराज पालखी दिंडी यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत

गजानन महाराज पालखी दिंडी यात्रा कांद्री कडे जात असतांना जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री , अरूण डोमणे परिवार, उमेश कुंभलकर मित्र परिवार व्दारे श्री संत गजानन महाराज पालखीचे फुलाच्या वर्षाने, फळ, राजगीरा पापडी वितरण करुन जल्लोषा त स्वागत करित पुजा अर्चना करण्यात आली. यावेळी संजय चौकसे, वामन देशमुख, मनोज मरघडे, हंसाबे हन पटेल, जयश्री मरघडे, किर्ती हटवार, लता बावनकु ळे, अरूणा हजारे, स्नेहा रक्षक, जयराम मेहरकुळे, हिरालाल बिहुणे, राजु देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे , महेश मंगतानी, ओमदास लाडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. महामार्गाने भ्रमण करित असतांना भारत माता चौक, आशीर्वाद मंगल कार्यालया समोर पालखी चे नगराध्यक्ष सुजित पानतावणे, नगरसेवकांनी स्वागत केले.

भाजपा जिल्हा महामंत्री अतुल हजारे, नरहरी पोटभरे, शिवाजी चकोले, सौरभ पोटभरे, रोहित चको ले, उमेश वाडीभस्मे, पराग पोटभरे, धर्मेंद्र सरोदे, विष्णु सरोदे, देवेंद्रसिंह सेंगर, दिनेश खाडे, दिनेश राऊत, इंद्रपाल सुखदेवे, रविंद्र कोतपल्लीवार, प्रफुल हजारे, विजय पोटभरे, रोहित पानतावणे, शैलेन्द्र सावनेरे, कशिश पानतावणे, सविता राऊत, माधुरी मस्के,आरती कोतपल्लीवर, संघमित्रा डोंगरे, आरती चकोले, भारती पोटभरे, अंजली सिंह, गायत्री यादव सह गावकरी भाविकांनी संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले. पुढे जे एन दवाखाना चौकातुन बोरडा कडे पालखीचे मार्गक्रमण करण्यात आले.

Popular Articles