सावनेर १६ – सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी थांबवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आज सावनेर येथे होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेने एकजूट दाखवत उपविभागीय अधिकारी संपत खलाते यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल दाते यांनी केले.
शासनाच्या या निर्णयामुळे अनेक सीसीएमपी पात्र डॉक्टरांच्या वैद्यकीय व्यवसायावर अडथळे निर्माण झाले असून, त्यांच्या भवितव्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार लटकली आहे. ही नोंदणी प्रक्रिया तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. स्वप्निल काले, सचिव डॉ. नितीन सोमकुंवर, कोषाध्यक्ष डॉ. आकांक्षा निनावे, राज्य प्रतिनिधी डॉ. प्रशांत राजपूत, तसेच डॉ. अनूप जायसवाल, डॉ. मर्फी गजभिए, डॉ. मंजूषा दोरखंडे, डॉ. चित्रा लाकडे आणि डॉ. चारूलता सोनभद्र हे सदस्य उपस्थित होते.
याशिवाय नीमा शाखा सावनेरचे अध्यक्ष डॉ. छत्रपती मानापुरे, सदस्य डॉ. प्रशांत घोलसे, डॉ. संजय दोरखंडे, डॉ. गिरीश लाकडे, डॉ. पराग घाटोडे आणि डॉ. सुजाता घाटोडे यांचाही या शिष्टमंडळात सहभाग होता.
संघटनेने सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ववत झाली नाही, तर दिनांक १६ जुलै २०२५ पासून मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडले जाईल. होमिओपॅथिक डॉक्टरांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



