spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मध्यरात्री मोठा गेम, मुंबईतील मनसेचा हुकमी एक्का फुटला, राज ठाकरेंना धक्का

मुंबई :- महानगरपालिकेसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी सत्ताधारी पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. त्यातच मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे संतोष धुरी हे मनसेला रामराम करण्याची शक्यता आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.

नाराजीचे कारण काय?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती झाली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील अनेक महत्त्वाच्या वॉर्डमध्ये चढाओढ सुरु होती. या चढाओढीत काही वॉर्ड हे मनसेच्या वाट्याला गेले आहेत. तर काही वॉर्ड हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आले आहेत. महापालिका निवडणुकांच्या जागावाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेत संतोष धुरी यांचा इच्छुक असलेला प्रभाग क्रमांक १९४ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे ते बऱ्याच दिवसांपासून नाराज होते.

Popular Articles