spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रक्षा लेखा विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांचे स्नेह सम्मेलन उत्साहात

नागपूर :- नागपुर व जवळील परिसरात राहणाऱ्या रक्षा लेखा विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सहकुटुंबातील स्नेह सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. कर्यक्रमाचा शुभारंभ सर्वात वयोवृद्ध सेवानिवृत्त डी एन जोशी यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमोद खिरे, सेवानिवृत्त सहायक निदेशक (रा.भा) यांनी प्रस्तावना मांडली व आयोजनाचे उद्दिष्ट्येबद्दल सांगितले. लक्ष्मण लिखार, सेवानिवृत्त रक्षा लेखा संयुक्त नियंत्रक, यांनी आयोजन बद्दल समाधान व्यक्त केले, ते म्हणाले कि असे आयोजन झाल्याने एकमेकांच्या भेटी होतात व एकटेपणा ची भावना दूर होते.

सेवानिवृत्त सदस्यांच्या सुविधेसाठी जीवन प्रमाण एप डाऊनलोड करून जीवन प्रमाणपत्र प्रस्तुत करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यामुळे कार्यालयात व बैंकेत न जाता मोबाईल द्वारे ही प्रक्रिया सहज करता येते. अन्य उपलब्ध सेवांची पण माहीती देण्यात आली. ७५ वर्ष झालेल्या सदस्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. इतरही सर्व सदस्यांना दुपट्टे देऊन सत्कार केले. भारतीय रक्षा लेखा सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी एस.टी.रणदिवे, आनंद मेश्राम, एन.जी.चोखंदरे, बी.जी.थूल, बी.एम.हकीम, विनायक वर्तक, विकास मोहरीर व इतरही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशोक पझारे, किशन भिमटे, गेंदलाल गणवीर, पी.एम.देव, दिलिप बागेश्वर यांचे सहकार्य लाभले. जितेंद्र थुलकर यांनी संचालन केले तर सुधीर बरडे यांनी आभार मानले.

Popular Articles