जुनी कामठी पोलीस स्टेशनची नवीन प्रस्तावित इमारत होणार
स्लग:भाजी मंडी मार्केट च्या ठिकाणी डीसीपी कार्यालय उभारणार
कामठी, ता. १६ : स्थानिक कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या सर्व्ह क्र 3 ,ब्लॉक क्र 18 मालमत्ता एल 1 वर असलेले 3642 चौ मी क्षेत्रफळ वर इंग्रजांच्या काळापासून भरत असलेल्या भाजी मंडी परिसरातील कामठी नगर परिषदेच्या जागेवरील अतिक्रमण आज कडक पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले असून नगर परिषदेची जागा मोकळी करण्यात आली.तर या ठिकाणी आता जुनी कामठी पोलीस स्टेशनची इमारत सह डीसीपी कार्यालय उभारण्यात येणार आहे.
कामठी नगर परिषद ने 23 जून 2023 ला सुधारित मंजूर विकास योजनेतील ठराव क्र 7 मध्ये बदल करण्याचे सुचविले होते त्यानुसार सुधारित विकास योजनेतील भाजी मंडी मार्केट च्या ऐवजी पोलीस विभागासाठी राखीव करण्यात आली होती त्यानुसार आज 15 जुलै ला सकाळी 7.30 वाजेपासून भाजी मंडी परिसरात अतिक्रमनाचा बडगा उभारून त्यात असलेले 19 गाळे व 7 ओटे जमीनदोस्त करून जागा समतल करण्यात आली.
नागपूर शहर पोलीस दलात जुने कामठी पोलीस स्टेशनचा समावेश करण्यात आल्या पासून अतिशय जुनी व छोट्या जागेत जुने पोलीस स्टेशनची इमारत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना काम करण्यात नेहमीच अडचण होत असते याच अनुषंगाने नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दोन महिन्यापूर्वी त्रिकोणी चौक भाजी मंडी परिसराची पाहणी केली होती. आता जागेचा प्रश्न मोकळा झाल्याने येथील अतिक्रमण काढण्यात आले.
राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विकास योजनेतून कामठी शहराचा सर्वांगीण विकासाचा संकल्प केला असून कामठी नगर परिषदेच्या जागेवर इंग्रजांच्या काळापासून भाजी बाजार सुरू होता भाजी मंडी परिसरातील बाजारात ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी सहा वाजता सुमारास विविध भाजीपाला माल विक्रीसाठी आणत होते. त्या जागेवर कामठी नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी दुकानदाराच्या सोयीसाठी सिमेंट ओटे तयार करून रोडच्या बाजूने दुकानाची कॉम्प्लेक्स उभारली होती. जानेवारी २०१३ मध्ये कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शुक्रवारी बाजार परिसरात भाजीपाला बाजार सुरू केल्याने भाजी मंडी परिसरातील प्राचीन भाजी बाजार नवीन बाजारात हस्तांतरण करण्यात आल्यामुळे कामठी नगर परिषदेने बांधलेले भाजीपाला विक्रीचे सिमेंट ओट्याच्या जागेवर काही भाजी मंडी परिसरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून मोकाट जनावरे बांधून काही ठिकाणी वास्तव्यास येऊन अतिक्रमण थाटली होती ती सर्व अतिक्रमणे आज सकाळी सात वाजता सुमारास कामठी नगर परिषदेचे प्रशासक व मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर, जुनी कामठीचे पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात जुनी कामठी, नवीन कामठी, कळमना, पारडी, यशोधरा, कोराडी ,जरीपटका, कपिल नगर ठाण्यातील शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कडक पोलीस बंदोबस्तात बुलडोजर, पोकलँड मशीन लावून संपूर्ण अतिक्रमण भुई सपाट केले व कामठी नगर परिषदेच्या मालकीची शासकीय जमीन मोकळी करून देण्यात आली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमिनीवर जुनी कामठी पोलीस स्टेशनची प्रस्तावित इमारत तयार करण्यात येणार असून त्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अतिक्रमणा सोबतच लवकरच कामठी शहरातील मुख्य मार्गाने असलेले सर्व अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व प्रशासक संदीप बोरकर यांनी सांगितले.
सदर कारवाई कामठी नगर परिषदेचे प्रशासक संदीप बोरकर, वीरेंद्र ढोके, महेश चौबे, सुशांत जगताप, विजय मेथिया, प्रदीप भोकरे ,रुपेश जयस्वाल, दीपक जयस्वाल, अकक्षिश मलिक, विकी धामती, गंगाधर मेहर, गौरव शर्मा, रिषभ झंझोटे, शुभम टाकभोरे ,जजील अतीन यांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली




