कामठी १६ :-तालुका क्रीडा समिती मौदा येथे कामठी मौदा संयुक्त शारीरिक शिक्षकांची सभा पंचायत समिती मौदा येथे आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संजयजी डोंगरे सहाय्यक विस्तार अधिकारी पंचायत समिती मौदा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मरस कोल्हे सर, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मौदा उपस्थित होते.या प्रसंगी माया दुबळे तालुका क्रीडा अधिकारी मौदा, योगेश खोब्रागडे तालुका क्रीडा अधिकारी कामठी, मौदा तालुका क्रीडा सचिव मीनाक्षी निर्वाण, कामठी तालुका क्रीडा सचिव डॉ.मल्लिका नागपुरे कामठी व मौदा तालुक्याचे क्रीडा शिक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या संयुक्त सभेत सत्र २०२५ २६ चे क्रीडा आयोजनासंबंधीच्या सूचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली..व वर्ष भर राबविण्यात येणाऱ्या क्रीडा धोरणांवर चर्चा करण्यात आली.तालुका स्तरावर दहा खेळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे चर्चेअंती स्पष्ट करण्यात आले.या प्रसंगी माया दुबळे व योगेश खोबरागडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन साईबाबा विद्यालय निमखेडाची क्रीडा शिक्षक ईश्वर पत्रे यांनी केले



