spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आचारसंहितेमुळे जानेवारी महिण्यातील विभागीय लोकशाही दिन स्थगित

नागपूर :- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 ची आचारसंहिता सुरु असल्याने या महिण्यातील (12 जानेवारी 2026) विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दर महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, राज्यात महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता सुरु असल्याने या महिण्यातील विभागीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Popular Articles