किशोर साहू, मौदा, ता.८:- विश्रांति कॉन्वेंट स्कूल निमखेडा येथे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंचा सुनीता यागंटि व शांता खांडेकर यांच्या हस्ते झाले. विद्यालयाचे मुख्याध्यपिका बिंदु तगिरिसा व रक्षक खांडेकर आणि प्रणय नेरलेवार अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी उपकरणाची माहिती जाणून घेतली.विद्यालयाचे निर्देशक रक्षक खांडेकर भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांना विज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून शालेय प्रदर्शन भरविले जाते. घरातील स्वयंपाकगृहापासून विज्ञान सुरू होते. आपल्या सभोवताली असणाऱ्या बदलात विज्ञान दिसते. जिज्ञासा वृत्तीतून विज्ञानाची माहिती समजते. विज्ञानाबाबत अभिरुची वाढावी म्हणून शिक्षकवृंद प्रियंका दोरखंडे,रीना दारोडे,लतिका झाड़े,शारदा कृपाण,शालेमराज विदुरी, सारिका चोखान्द्रे,पल्लवी राउत,उषा भीवगड़े , वैभवि येलने, दिव्या अलपाती यांनी सदर प्रदर्शनाचे सफल आयोजन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.








