एक खिडकी कक्षाद्वारे मंजुर करण्यात आले १५८२ परवानगी अर्ज

0
45

चंद्रपूर :- आचारसंहिता लागु झाल्यानंतर लागणाऱ्या विविध परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाद्वारे प्रचार करावयाच्या शेवटचा दिवस मिळुन एकुण १५८२ अर्जांना परवानगी देण्यात आली.

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आचारसंहिता लागु झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांना, उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या, परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला होता. १५ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत परवानगीसाठी या कक्षास १६५९ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी १५८२ अर्ज मंजूर करण्यात आले तर ७७ अर्ज नामंजुर करण्यात आले.

प्रचार कार्यालय,रॅली,मेळावा,मिरवणुक,रोड शो, बॅनर, कट आऊट,पोस्टर्स,जाहीर सभा,कॉर्नर सभा,प्रचार वाहन इत्यादी विविध परवानग्या देतांना एकुण ६५,४८,६२२ रुपयांची आमदनी या कक्षाद्वारे मनपास प्राप्त झाली आहे.