मानवी तस्करी जागरूकता दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन

0
46

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय तंत्रनिकेतनातर्फे राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिन व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश दीपक एच. दाभाडे, प्राचार्य पी. पी. पवार, नदीम कुरेशी आदी उपस्थित होते.

प्रा. संदीप नगराळे यांनी मानव तस्करी ही आधुनिक गुलामगिरी असून लैंगिक शोषण, मजुरी व अवयव विक्रीसाठी लोकांची विक्री केली जाते. ही तस्करी रोखण्यासाठी जागरूकता वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महत्व सांगितले. मानव तस्करी रोखण्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना व पीडितांना न्याय मिळवून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी कायदेपालन, शिस्त व नशामुक्त जीवनशैली स्वीकारून जबाबदार नागरिकत्व जपावे, असे आवाहन न्या. दाभाडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. सब्बनवार यांनी केले. यावेळी प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.