spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रीहरीनगर, मानेवाडा येथील ज्येष्ठ नागरिकांची दर्शनीय माहूरगड सहलीने घेतला आनंद

नागपूर :- श्रीहरीनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे दोन दिवसीय दर्शनीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. १७ जानेवारी ला सर्वप्रथम भक्तमंडळींनी खडकी येथे संकट मोचन हनुमानजीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी नाश्ता करून माहूरगडसाठी प्रस्थान केले. कळंबच्या समोर मानापुर येथील गार्डनमध्ये सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला‌. गार्डनमधील मनमोहक, आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला आणि सर्वांनी “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ” हे गाणे गाऊन निसर्गाचे महत्व पटवून दिले. आपल्याला निसर्गाने भरभरून दिले, आपणही निसर्गाचे संवर्धन करू या. ही आकांक्षा मनी बाळगून बस माहूरगडच्या प्रवासासाठी निघाली.

माहूरगडला पोहचल्यावर भक्तमंडळींनी सर्वप्रथम आई रेणुकामातेचे, परशुरामाचे, माॅ.अनुसया मातेचे व श्री.दत्तप्रभूचे दर्शन घेतले. माहूरगडावरुन माहूरवस्तीकडे परतीचा प्रवास करतांना डोंगरदऱ्यातील डूलणारी झाडे, निसर्गरम्य परिसर व रात्रीला गावातील दिव्यांचे लख लखणाऱ्या प्रकाशाचे विलोभनीय दृश्य पाहून सर्व भक्तमंडळीचे मन आनंदाने भरून आले. त्यानंतर सायंकाळी कुलस्वामिनी हॉटेलमध्ये भक्तमंडळीनी रुचकर, स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारला माहूर येथे भक्तमंडळींनी नाश्ता केला व बसचे कळंबसाठी प्रस्थान झाले. कळंब येथे श्री.चिंतामणीचे दर्शन घेतले. उत्तम अशा प्रकारच्या भोजनाची व्यवस्था प्रसादालयात करण्यात आली होती. सर्वांनी प्रसादालयात भोजन केले या सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांनी विनामूल्य बस देऊन सहकार्य केले. प्रतिष्ठानतर्फे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजीव मिश्रा (सचिव) यांच्या सहकार्याबाबत आम्ही सर्व भक्तमंडळीं त्यांचे आभारी आहोत. सहल यशस्वी करण्यासाठी श्रीहरी नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकारी सुरेशराव उरकुडे, विठ्ठलरावजी घोडे, डॉ. अशोक मंदे, नामदेवराव खाटके, प्रवीण सुरकर, हरीश लाकडे, नरहरी महाजन, अशोक कोरडे, साहेबराव सरोदे, अशोक माहुरे, वडीखाये, वराडकर, मंगला उरकुडे, पुष्पा सुरकर, रेखा लाकडे, कोल्हे व सर्व भक्तमंडळींचे सहकार्य लाभले.

Popular Articles