नागपूर :- सर्व जाती आणि धर्मांमधील घटस्फोटीत तसेच विधवा- विधूर यांचे घर पुन्हा वसविण्याच्या हेतूने त्यांच्या पुनर्विवाह परिचय मेळावा घेण्याचा स्तुत्य उपक्रम महात्मा फुले शिक्षण संस्थेने हाती घेतला आहे. रेशीमबाग मधील संस्थेच्या सभागृहात 22 फेब्रुवारीला (रविवारी) होणाऱ्या या मेळाव्यासाठी 12 फरवरी पर्यंत नावे नोंदविणे आवश्यक आहे. असे संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांनी आज टिळक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. नोंदणी फॉर्म संस्थेच्या कार्यालयात आणि mahatmafuless@gmail.com या ईमेलवर उपलब्ध राहतील. यासाठी ५०० रुपये शुल्क आहे. नोंदणी झालेल्यांची परिचय पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष प्रकाश देवते (9422809688 ) व अध्यक्ष अरुण पवार (9822697899) यांच्या मोबाईलवर संपर्क साधू शकता. पत्रकार परिषदेला उपस्थित अध्यक्ष अरुण पवार, कार्याध्यक्ष प्रकाश देवते, गुलाब चिचाटे, रवींद्र अंबाडकर, रमेश राऊत, मुकेश घोळसे, राजेंद्र पाटील, अभिजीत पोतले, पंकज कुरळकर व देवराव प्रधान याची उपस्थिती होती.








