किशोर साहू, मौदा, ता.20 :- एनटीपीसी मौदा अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पबाधीत गावांमध्ये विकास कामांसाठी शनिवार (दि.१७ जानेवारी) ला एनटीपीसी मौदा येथे सी एस आर निधी नियोजित सभा घेण्यात आली. या सभेच्या माध्यमातून प्रकल्प बाधित गावांमध्ये एनटीपीसीमुळे प्रादुर्भाव होत असलेल्या गावांवर नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधित उपाय सुचवून त्या अमलात आणण्याचे ठरविण्यात आले. प्रकल्प बाधित गावातील नवीन पिढीला एनटीपीसी मध्ये सहज रोजगार मिळण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, असे सुचविण्यात आले. प्रकल्प बाधित गावात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल कशा बनवता येईल जनेकरून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास ,विधार्थी डिजिटल बनण्यास सोईचे होईल व संपूर्ण गावातील जनतेचा विकास कसा करता येईल या संपूर्ण विकास कामावर एनटीपीसी प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेला खंडाळा (गांगणेर) सरपंच संकेत झाडे, सरपंच गट ग्रा.पं.अंजनगाव(इसापूर) चिंतामण सारवे , सरपंचा ग्रा. पं.तारसा वैशाली लेंडे ,उपसरपंच तारसा चंद्रशेखर गभने, माजी सरपंच महेंद्र तांडेकर , ग्रा. पं सदस्य आशिष मेहर व प्रशासक मंडळी उपस्थित होते.








