केळवद :- केळवद अंतर्गत महीला आरोपी नामे कौतुके दिलीप राजपुत, वय ५० वर्षे, रा. पारधी बेडा, तिडंगी हीचेवर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे नोंद आहे. नमुद महीला असे गुन्हे करण्याच्या सवयीची आहे. नमुद महीला आरोपी ही हातभट्टी मोहाफुल गावठी दारू तयार करून विकी करते तिचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी कारवाई करून तिचेवर गुन्हे नोंद केले. तसेच पोलीसांनी तिचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु कौतुके दिलीप राजपुत हीने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. तिच्या गुन्हेगारी कृत्यामुळे अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. नमुद आरोपीचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात केळवद पोलीसांकडुन एम.पी.डी.ए. कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली, मा. जिल्हाधिकारी नागपुर यांनी दिनांक ०९/०१/२०२६ रोजी नमुद महीला आरोपीला स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केला होता परंतु नमुद महीला ही मिळुन येत नव्हती.








