जलालखेडा :- फिर्यादी हीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन जलालखेडा येथे अप क्र. २४१/२०१७ कलम ३७६ (२) (जे) (एल) भादवी सहक ४,६ पोक्सो सहकलनम अ.जा.ज.अ.प्रति. अधिनियम अन्वय अन्वये गुन्हा नोंद झालेला होता.
सदर गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादीची पुतनी पिडीत ही अल्पवयीन तसेच मतिमंद आहे हे माहीत असतांना दिनांक १३/१२/२०१७ चे पुर्वी पासुन यातील आरोपी नामे दिलीप नत्थु शेंडे, वय ४६ वर्ष रा. रोहना ता नरखेड याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याने नमुद पिडीता गर्भवती झाली.
तपासी अधिकारी विकम कदम, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल उपविभाग यांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपी विरूध्द सबळ पुराव्यानिशी दोषारोपत्र मा. न्यायालयात दाखल केले. दिनांक २१/०१/२०२६ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायधीश १२ जहीर अब्बास शेख यांनी नमुद आरोपी दिलीप नत्थु शेंडे वय ४६ वर्ष रा. रोहना ता नरखेड यास कलम ३७६ (२) (एल) भादवी मध्ये आजन्म कारावास व १०,०००/- रू. दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.