कामठी :- आपल्या भारतीय संस्कृतीत ग्रामीण व शहरी भागात मकरसंक्रांतीचे, हळदी कुंकू कार्यक्रमाचे विशेष महत्व आहे.तेव्हा आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी तीळगुळाच्या गोडव्या प्रमाणे परस्पर स्नेहसंबंध वाढविण्यावर भर दिला पाहिजे .महिला शक्तीला अधिक जागृत आणि सक्षम करण्यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे असे मौलिक प्रतिपादन प्रभाग क्र 12 च्या नवनिर्वाचित नगरसेविका रंजना अशोक पानतावणे यांनी बजरंग पार्क येथील शारदा मंदिर परिसरात आयोजित हळदी कुंकू व महिला उत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी शिला पाटील,ज्योती पवार,संगीता नागोसे, सुनीता कनोजे,सोनाली साखरकर, कांता साखरकर,प्रभा मुळे, गीता कनोजे,सीता कनोजे,कल्पना करसकर,मंगला करसकर ,संगिता जामगडे,पिंकी हाटडकर, बाली हाराडे, चंद्रकला तूप्पट, आशा बनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेविका रंजना अशोक पानतावणे यांच्या हस्ते सर्वाना वाण देऊन सत्कार करण्यात आला व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.