तिरोडा :- तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेले गट ग्रामपंचायत धादरी/उमरी येथील मौजा धादरी मध्ये बुध्द विहार लगत विशेष दलीत वस्ती योजने अंतर्गत दहा लाख रुपयाचे समाजमंदिर मंजूर झाले आहे. या समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन सरपंच अजित ठवरे यांचे अध्यक्षतेखाली समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी तोमेश्र्वरी बघेले जिल्हा परिषद सदस्य वडेगाव क्षेत्र), कुंता पटले, सदस्य पंचायत समिती तिरोडा, प्रमिला भेलावे सदस्य पंचायत समिती तिरोडा, मनिषा पटले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती तिरोडा, मंगला उके पोलीस पाटील, सुनिल पटले ग्राम पंचायत सदस्य, सुरेश पटले सदस्य ग्राम पंचायत, अमिताभ चौरे सदस्य ग्राम पंचायत,विशाल चौधरी ग्रामपंचायत अधिकारी, घनश्याम रहांगडले अध्यक्ष तं. मु. स., रत्नमाला भौतिक, उषा भौतिक, चुन्नीलाल पटले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, शरद भौतिक स्वस्त अन्न धान्य दुकानदार,दिपक नागपुरे,उत्तम कुकडे, सुरेश चव्हाण, सचिन वैद्य, प्रफुल चव्हण, सिध्दार्थ भौतिक, रमेश गेडाम, संतोष भगत, विलास मेश्राम, बबन बागडे, शामलाल पटले, विकास उके, रमेश उके, सोनू गेडाम, रोहीत भौतिक,कविदास तुमसरे परिचर, हौसिलाल पटले, चंद्रसेन बागडे, हीवराज वैद्य, इतर ग्रामवासी हजर होते. या वेळी सरपंच अजितकुमार ठवरे यांनी आमदार विजयभाऊ राहांगडले, भाऊराव कठाने तसेच सर्व पदाधिकारी यांचे समाजमंदिर मंजुरी करीता योगदान लाभले असे सांगुन त्यांचे आभार मानले.
धादरी येथे समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न !
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.