Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रामटेक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवासाठी रामटेक सज्ज

– ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी ला होणार महोत्सवाचे आयोजन 

– सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम होणार आगमन   

 सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या रामटेक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाची सुरुवात कवी कालिदासच्या भूमीतून रामटेक येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ ला नेहरू मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. ३० जानेवारी २०२६ ला सुदेश भोसले व साधना सरगम, ३१ जानेवारीला कुमार विश्वास, व १ फेब्रुवारीला सोनु निगम यांच्या संगीतमय कार्यक्रम होणार आहे. रामटेक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. या महोत्सवापूर्वी जनतेचा सहभाग वाढावा यासाठी २८ जानेवारी पासून क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात बुध्दीबळ, कबड्डी, बॅडमिंटन, स्केटिंग, नौकानयन, हाॅलीबाल, मेहेंदी, रांगोळी, कुस्ती, मॅराथॉन अशा विविध स्पर्धा होणार आहेत. यावेळी बक्षीसांची लयलुट होणार आहे. रामटेक सांस्कृतिक महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंग ची व्यवस्था ठिक ठिकाणी केली आहे. महिला बचत गटांना आर्थिक मदत व्हावी यासाठी खाद्य पदार्थाचे स्टाॅल लावले जाणार आहे. पत्रकार परिषदला तहसीलदार रमेश कोळपे, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, न.प.उपाध्यक्ष आलोक मानकर, संजय मुलमुले प्रामुख्याने उपस्थित होते.

महोत्सवामागचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हेः जयस्वाल

रामटेक येथे एवढ्या मोठ्या भव्य महोत्सवाचे आयोजन फक्त मनोरंजनासाठी करण्यात येत नसून त्याचा मूळ हेतू म्हणजे रामटेकचे नाव दूरवर पोहोचावे हा असल्याचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सांगितले. रामटेकचे नाव भारतात प्रसिद्धीच्या झोतात येऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविले जावे व रामटेकचा सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी जनतेने यात सहभाग घेऊन हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन राज्यमंत्री जयस्वाल यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com