spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर तालुक्यात खळबळ: मेहेगाव येथे तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या

– अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरली

हंसराज, प्रतिनिधी भंडारा तुमसर :- तुमसर तालुक्यातील मेहेगाव येथे एका २८ वर्षीय तरुणाची अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल गणेश राणे (वय २८, रा. मेहेगाव) असे मृतकाचे नाव आहे. कपिल हा २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २३ जानेवारी रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या दरम्यान मेहेगावपासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिशेकडील परिसरात होता. या काळात अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कारणावरून कपिलवर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, कपाळावर आणि कुशीवर सपासप वार करून त्याला जागीच ठार मारले.

या प्रकरणी मृतकचा मोठा भाऊ पंकज गणेश राणे (वय ३३, रा. मेहेगाव) यांनी तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून आणि पोलीस निरीक्षकांच्या (PSO) आदेशानुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३३/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम हे करत आहेत. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे मेहेगाव परिसरात शोककळा पसरली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.