spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हद्दपार आरोपीला घातक शस्त्रासह अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

नागपूर १८ : गुन्हे शाखा युनिट क्र. ०२ च्या पथकाने १७ जुलै २०२५ रोजी अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईत एका हद्दपार आरोपीला घातक शस्त्रासह अटक करण्यात आले. सायंकाळी सुमारे ४.३० वाजता पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की जुना आंबेडकर भवन, अंबाझरी तलावाजवळ एक हद्दपार इसम संशयास्पद स्थितीत फिरत आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित इसम पोलिसांना पाहून पळू लागला. त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव अक्षय किशोर मडावी (२७ वर्षे, रा. न्यू फुटाळा वस्ती, नागपूर) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ₹५०० किमतीचा एक लोखंडी चाकू आढळून आला जो पोलिसांनी जप्त केला. अंबाझरी पोलीस ठाण्यात आणून तपास केला असता, आरोपीवर पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ यांच्या आदेशानुसार १४ मे २०२५ रोजी एक वर्षासाठी नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपार केल्याचे स्पष्ट झाले. परंतु तो कोणतीही परवानगी न घेता शस्त्रासह गुन्हा करण्याच्या उद्देशाने हद्दीत फिरताना आढळून आल्याने, त्याच्यावर कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा तसेच कलम १३५ व १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अंबाझरी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त  रविंद्रकुमार सिंगल, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)  संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन)  राहुल माकणीकर, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. महेश सागळे आणि त्यांच्या पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.