महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य भुजबळ यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

0
89

नवी मुंबई, १९ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची  सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी  पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी  भुजबळ यांना आयोगाच्या बेलापूर येथील मुख्यालयात शपथ दिली.

या प्रसंगी आयोगाचे सदस्य सवश्री अभय वाघ, सतिश देशपांडे, राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन यांच्यासह आयोगाचे सहसचिव अवताडे उपस्थित होते.