spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकसित भारताकड़े पाऊलल टाकणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- केंद्रिय अर्थमंत्री निर्मलाजी सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाला नवी उर्जा देणारा असून आत्मनिर्भर विकसित भारताची वाटचाल करणारा आहे. अर्थमंत्री सितारमण यांनी अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्याची तरतूद करण्यात आली. अपघात विमा वर आता टॅक्स रद्द करण्यात आला त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. मंदिरांसाठी 5 हजार कोटीची तरतूद, महिलासाठी खास मार्टची उभारणी करण्यात येणार आहे. तथापि, महिलांना सक्षम होण्यास चालना मिळणार आहे. शेतक-यासाठी एआय टूल तयार करण्यात येणार असून पशुपालनसाठी अनुदान,शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात येणा-यां मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाला बायो हब बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

– डॉ. पंकज भोयर पालकमंत्री वर्धा- भंडारा जिल्हा तथा राज्यमंत्री

Popular Articles