spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकगीते व मराठी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध

– मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्यात सांगितिक कार्यक्रम

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने रेशिमबाग मैदानावर आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्यात आज (ता. १) लोकगीते व लोकप्रिय मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. या सांगितिक मैफीलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नागपूर महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभागातर्फे अंत्योदय दीनदयाल नागरी राष्ट्रीय उपजिविका मिशनअंतर्गत शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला उद्योजिका मेळावा आयोजित केला आहे.

दुसर्या दिवशी सांगितिक कार्यक्रमाला नगरसेविका दिव्या धुरडे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त मंगेश खवले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, बारी विंडो टू डेकोस्टाईलच्या संचालिका स्वाती सांघी, मॅकवर्ड ट्रॅव्हल्सच्या संचालिका धनश्री गंधारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेविका दिव्या धुरडे यांनी महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. यामुळे शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, अशा विश्वास व्यक्त केले. यावेळी स्वाती सांघी व धनश्री गंधारे यांनी व्यवसायातील अनुभव विषद केले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा महापालिकेचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर सांगितिक कार्यक्रमाला सूुरूवात झाली. जल्लोष बँडच्या या संगीत मेफीलीने श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला. संगीत मेफीलीची सुरूवात गोंधळाने झाली. पारंपारिक वेषात असलेल्या कलावंतानी गोंधळाला यावे, या पहिल्याच गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर मराठी लोकप्रिय गीते व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. मला वेड लागले, ही चाल तुरू तुरू ही लोकप्रिय मराठी गीते तसेच सुनो गौर से, लहरा दो, तेरी मिट्टी सारखे देशभक्तीपर गीतांनी श्रोत्यांना अखेरपर्यंत खिळवून ठेवले.

जल्लोष बैंडचे गायक पुनीत कुशवाह या युवा गायकाने दमदार आवाजाने श्रोत्यांना लोकप्रिय मराठी गीते गायिले. त्यांना कि बोर्डवर अयूर बंगैया, गिटारवादक रुगवेद पांडे, ड्रमवादक तेजस अंबुलकर, तबलावादक मनीष निलाटकर व ढोल वाजविण्याचे साथ मोहित वंशकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन अंकिता मोरे यांनी केले.

Popular Articles