हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- धान खरेदीदार संस्थांकडून खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत भंडारा जिल्हयामध्ये शेतकऱ्यांकडुन धान खरेदी करण्यात आलेली आहे. या धानाचे शेतकरी चुकार दि. ०४/०२/२०२६ रोजी ४४५.९८ कोटी प्राप्त झालेले असुन जिल्हा पणन अधिकारी, भंडारा मार्फत शेतकरी चुकारे रक्कम अदा करण्याचे कार्यवाही सुरु असून दि. ०५/०२/२०२६ रोजी पर्यंत १०२.०३ कोटी शेतक-यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरीत शेतकरी चूकार दोन दिवसात अदा करण्यात येईल, अशी माहिती एस. एस. पाटील, जिल्हा पणन अधिकारी भंडारा यानी दिली आहे.



