“आईच्या प्रेमास मान आणि निसर्गाला जीवनदान” वाघबोडी प्राथमिक शाळेत भावनिक व पर्यावरण पूरक उपक्रमासह छत्री वाटपाच्या आगळावेगळा कार्यक्रम 

0
140
किशोर साहू, मौदा, ता.२१: तालुक्यातील गट ग्रामपंचायत बोरी घिवारी अंतर्गत येणाऱ्या वाघबोडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शाळेत नियमित हजर राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यांच्या शाळेप्रती आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटावा या उद्देशाने छत्री वाटपाच्या आगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामसेवक वैभव बावनकर यांच्या विशेष मार्गदर्शनातून व त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून या उपक्रमाची मांडणी झाली. त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे आणि सक्रिय पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर भेट वस्तू देण्याच्या उपक्रम प्रत्यक्षात आला. याच कार्यक्रमांतर्गत “एक पेड मा के नाम” या भावनिक आणि पर्यावरण पूरक उपक्रमांतर्गत सरपंच विशाल सेलोकर,ग्रामसेवक  वैभव बावनकर, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यगण ,कर्मचारी शिक्षकवृंद आणि समस्त विद्यार्थी गण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. ही फक्त भेट नव्हती तर संवेदनशील प्रशासनाची एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती होती आणि हे रोप नाव ते फक्त झाडाचे तर भविष्याच्या हिरव्या आशेचे होते.