कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चंद्रमनी नगर येथील गजभिये कुटुंबातील कुटुंबीय सदस्य घराला कुलुप लावून बिलासपूर छत्तीसगढ येथे लग्नाला गेले असता अज्ञात चोरट्याने ही संधी साधून घराचे दार तोडून घरात अवैधरीत्या प्रवेश करून घरातील लोखंडी आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 5000 रुपये,21 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,1000 रुपये किमतीचा चांदीचा ग्लास असा एकूण 27 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना गतरात्री 11 वाजता घडली असून यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
चंद्रमनी नगर येथे 27 हजार 500 रुपयांची घरफोडी
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.