नागपूर :- स्वरधारा परिवारातर्फे शनिवारी 21 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता. उत्कर्ष हॉल, हिंदी मोर भवन सीताबर्डी, नागपूर येथे हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम – द गोल्डन मेलॉडिज – चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना संयोजक आयोजक, गायक असलेल्या चंद्रशेखर तासगांवकर यांची असून संजय कुळकर्णी व अशोककुमार गांधी हे तांत्रिक व प्रस्तुती सहयोगी आहेत, श्रीकांत पैठणकर, शेखर जोगवार, श्रद्धा डाऊ, रोहिणी पाटणकर, मानसी बढे, वंदना कडू, हे गायक कलाकार गीते सादर करतील. निवेदन अशोक गांधी यांचे आहे व संजय कुलकर्णी तांत्रिक बाजू सांभाळतील. प्रवेश नि:शुल्क असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्वरधारा परिवार प्रस्तुत “द गोल्डन मेलॉडिज ” शनिवारी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



