Thursday, February 26, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज’ आंतरशालेय मुलां-मुलींची बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात 

नागपूर :- सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिल्ट्री स्कूल रवीनगर येथे १७ व १८ फेब्रुवारीला ‘छत्रपती संभाजी महाराज’ आंतरशालेय बॉक्सिंग चॅम्पियनशिप अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कब (२०१६-१७), कॅडेट (२०१४-१५) आणि सब-ज्युनियर (२०१२-१३) या गटांतील मुला- मुलींमध्ये विविध वजन गटांनुसार सामने रंगले. सर्व सामने व्यावसायिक पंचांच्या देखरेखी खाली तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजनां सह पार पडलेत. स्पर्धेत एकूण ८० खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, जिद्द आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रमुख अतिथी अरुण बुटे यांच्या हस्ते पदके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूस ‘बेस्ट बॉक्सर’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र शासन सर्टिफाइड एन.आय.एस.बॉक्सिंग कोच गणेश पुरोहित, बॉक्सर सुदीप शेंडे तसेच ब्रिगेडियर गावपांडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अशोक बनसोड, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट व सचिव विजय कागभट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी यांच्या कुशल नियोजन व प्रभावी नेतृत्वामुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पडली. बॉक्सिंग कोच लावांशू खडतकर तसेच बॉक्सील प्रो बॉक्सिंग क्लब यांच्या सहकार्याने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व क्रीडाभावना अधिक दृढ झाली असून प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगर क्रीडा क्षेत्रातील आपली वेगळी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com