ग्रामौन्नती प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

0
137
Oplus_131072

 

 
दखने हायस्कुल कन्हान येथे कार्यक्रमासह वितरण. 
 
कन्हान २२ : – ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे आधार गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप योजना उप क्रमांतर्गत  बळीराम दखने (विकास) हायस्कुल कन्हान येथील १०० गरजु विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार  प्रकाश भाऊ जाधव व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मोफत नोटबुक, कंपाऊस साहित्या सह पाऊच चे वितरण करण्यात आले.
सोमवार (दि.२१) जुलै २०२५ ला सकाळी ११.३० वाजता  बळीराम दखने (विकास) हायस्कु ल कन्हान चे मुख्याध्यापक  सचिन अल्लडवार सर यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठा ण चे अध्यक्ष माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव , उपाध्यक्ष- दिलीप राईकवार, सचिव- सचिन साळवी, प्रकल्प प्रमुख मोतीराम रहाटे, विकास शाळेचे माजी विद्यार्थी विजय डोणेकर, गोविंद जुनघरे, प्रदीप वान खेडे, सौ. लताताई वंजारी आदीच्या हस्ते सरस्वसती मातेचे पुजन, पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी आम्ही या शाळेतील माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान बाळगुन आम्हच्या ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे गरजु विद्यार्थ्याना मोफत नोटबुक, पेन, पेन्सील, रबर व पाऊच वितरण करण्याच्या सेवाभावी कार्याचा शुभा रंभ करून शहरातील इतरही शाळेत हा उपक्रम राब विणार आहे. असे संबोधित करून उपस्थित विद्यार्थ्यां ना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक अल्लडवार सरांनी ग्रामौन्नती च्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करित आपल्या विकास शाळेचे ४५ वर्षा पुर्वी शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आपल्या शाळेचे समाजाचे ऋृण फेडण्याकरिता काहीतरी देणे लागते. या उदात्त हेतुने शाळेतील जवळपास १०० गरजु विद्यार्थ्याना नोटबुक सह साहित्य वितरण केल्याबद्दल संस्थेचे आभार व्यकत केले. कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री नखाते मँडम हयानी तर आभार एन. आर. चव्हाण सर हयानी व्यकत केले. कार्यक्रमास पत्रकार सुनिल सरोदे , कमलसिह यादव, आकाश पंडीतकर, ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाणचे रूपेश सातपुते, प्रतिक जाधव, पुरूषोत्तम येणेकर, संतोष गिरी, दामोधर बोकडे, तेजस, संजय वानखेडे, शाळेचे शिक्षक सुरेश बेलनकर सर, काठोके सर, अमित थटेरे सर, शिक्षिका लता काथवटे सह शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.