कन्हान २२ : – उच्च प्राथमिक शाळा बनपुरी येथील विद्या र्थ्यानी इयत्ता ६ वी व ८ वी च्या ६ विद्यार्थ्यानी शिष्य वृत्ती परिक्षेत उतिर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र होऊन स्वत:चे, आई-वडिलांचे आणि शाळेचे नावलौकिक केले.
सत्र २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत १) कु. परिणिती महेंद्र देशमुख वर्ग ५ वी, २) कु. शर्वरी सुरेखा आंबिलढुके वर्ग ८ वी, ३)
कु. विधी राजु भोदे वर्ग ८ वी, ४) कु. रिया नरेश बावन कुळे वर्ग ८ वी, ५) कु. कृतिका संजय वंजारी वर्ग ८ वी , ६) कु. आरुषी राजेन्द्र शिवरकर वर्ग ८ वी, ७) अनुकुल बालाराम बावनकुळे वर्ग ८ वी हयानी परिक्षेत चांगल्या मार्क घेऊन उतिर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे. यात इयत्ता ५ वी मध्ये एक मुलगी आणि इयत्ता ८ वी चे ६ विद्यार्थी पात्र होत हे ६ ही विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहे. त्याबद्दल गावक-यांचा जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारा त्मक झाला. विद्यार्थीनी ही यशाची मालिका मागच्या वर्षा सारखी चालु ठेवली आहे. या यशा बद्दल विद्या थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मुख्याध्यापिका सौ. सुमित्रा कारेमोरे मॅडम ज्यांनी वर्ष भर विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परिक्षेचे वर्ग घेवुन मार्गदर्शन केले. तसेच वर्गशिक्षक वाहाणे सर, कु जैस्वाल मॅडम, सौ. सांगळे मॅडम यांनी विद्याथ्याचा परिक्षेचा सराव करिता मेहनत घेतली. शाळा व्यवस्थापन समि ती, सरपंचा मॅडम, ग्रामसेवक, पालक वर्गानी विद्या र्थ्यावर अभिनंदनाचा वर्षीव केला आहे.


