spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान शहर व परिसरात होळीचा सण उत्साहाने साजरा 

– पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित. पाडव्याला गुलाल, रंग लावुन होळी उत्सव संपन्न

कन्हान :- शहरात व ग्रामीण परिसरात होळी च्या दिवसी होळी जाळुन पाडवा म्हणजे धुलिवंदनेला एकमेकाना गुलाल, रंग लावुन अंधकार, वाईटावर विजयाचा होळीकात्सोव शांततेत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सोमवार (दि.२) मार्चला होळी पौर्णिमा सणा निमित्त गणेश नगर, हनुमान मंदीर पांधन रोड कन्हान, कांद्री, टेकाडी, खदान, गोंडेगाव, घाटरोहणा, वराडा, एसंबा, वाघोली, केरडी, बोरडा, खेडी, एसंबा, सालवा, निलज, खंडाळा या सह इतर गावागावात पारंपारिक पद्धतीने होळी उभारण्यात आल्या होत्या. महिलांनी, पुरुषांनी धार्मिक विधीपुर्वक होळीचे पुजन व पुरण पोळी चा नैवध करुन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली. मंगळवार (दि.३) मार्च ला धुलिवंदनाच्या दिवशी एकमेकाना गुलाल, रंग लावुन पारंपरिक ढोल – ताशांच्या गजरात नागरिकांनी एक मेकांना शुभेच्छा देत होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक असलेला हा सण सामाजिक एकोपा आणि प्रेमाचा संदेश देणारा ठरला.

होळी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक सण मानला जातो. भक्त प्रल्हादाच्या अखंड श्रद्धेचे प्रतिक असलेली ही होळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देणारा आहे. याच परंपरे चा वारसा जपत नागरिकांनीही धार्मिक भावना आणि सामाजिक एकात्मतेचा संगम साधत कन्हान शहर व परिसरात होळी हा सण शांततेत आंनदात साजरा करण्यात आला.

Popular Articles