spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रेरणा महिला संगठनाचा सावन मेला उत्साहात; महिलांची मोठी गर्दी

 

नागपूर २२ : प्रेरणा महिला संगठनद्वारा आयोजित सावन मेला बुधवार, 16 जुलै रोजी रविनगर येथील श्री अग्रसेन भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांसाठी आयोजित या भव्य तीज मेळाव्यात 3500 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. श्रावण मासातील सुंदर वातावरणात महिलांनी झुल्यांचा, मेंदी, टॅटू, सेल्फी पॉईंट आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेतला. महिलांनी साड्या, ज्वेलरी, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, राख्या अशा विविध वस्तूंच्या स्टॉलवर खरेदी करत आपली कला प्रदर्शित केली. मेळ्याचे उद्घाटन वृंदा विकास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांनी समाज आणि कुटुंब यांना एकत्र बांधून ठेवण्याचे महत्व सांगत प्रेरणा महिला संगठनाच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात उद्योगपती अरुणकुमार अग्रवाल, सुमित्रा अग्रवाल, रामानंद अग्रवाल, नगरसेविका प्रगति अजय पाटील, मंजू चंद्रिकापुरे, सुगत चंद्रिकापुरे, संदीप बी जे अग्रवाल, दुर्गाप्रसाद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष दीप्ति संदीप अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत 250 हून अधिक महिला संघटनेत सहभागी झाल्या असून महिलांना सशक्त मंच देण्यासाठी व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी प्रेरणा कार्यरत आहे. कार्यक्रमात दीपिका, मोनिका, राशि आणि सावी अग्रवाल यांनी सांस्कृतिक नृत्य सादर केले. संयोजक किरण अग्रवाल, मधु मित्तल, आशा पचेरिवाला, दीपशिखा अग्रवाल, मेघा अग्रवाल यांनी समाज बांधवांचे आभार मानले. सचिव मेघना अग्रवाल, कोषाध्यक्ष प्रिया मोहित अग्रवाल, उपाध्यक्षा कोमल, अंजू, दीपा अग्रवाल यांच्यासह संपूर्ण टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.