Tuesday, April 28, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद; ₹३१,०४० चा मुद्देमाल जप्त

काटोल :-  काटोल पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मोटरसायकलने अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ मौजा बाजार चौक, दिग्रस बुर्ज येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान हिरो होन्डा कंपनीची सि डी १०० मोटर सायकल क्र. एम एच ३१ वि ५६२८ मिळुन आली. वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता देशी दारू मिळुन आली. आरोपी नामे अशोक नथ्थुजी सुरजुसे, रा. दिग्रस बुर्ज, ता. काटोल, जि. नागपुर हा अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष १) देशी दारूच्या १३ निपा किंमती १०४०/-रूपये, हिरो होन्डा कंपनीची सि डी १०० मोटरसायकल क्र. एम एच ३१ बि ५६२८ किंमती ३०,०००/- रू असा एकुण किंमती ३१,०४०/- रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.