Friday, March 13, 2026
spot_imgspot_img
spot_img

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक; आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद, ८ जनावरांची सुटका

मौदा :-  मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, भंडारा ते नागपूर रोडने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी माथनी शिवारात भंडारा ते नागपूर रोडवर नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान महेंद्रा बोलेरो क्र. एम एच ४०सी टी ९७२७ हे वाहन मिळुन आले. सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने पोलीसांचे वाहन पाहुन गाडी थांबवुन वाहनामधुन उडी मारून पळुन गेला. पोलीसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ०८ गोवंश जनावरे असे मिळुन आले. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून महेंद्रा बोलेरो क्र. एम एच ४० सी टी ९७२७ किंमती ६,००,०००/- रूपये आणि ०८ गोवंश जनावरे किंमती ८०,०००/- रूपये असा एकुण ६,८०,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपी विरूद्ध कलम ११(१) (ड) (ई) (फ) प्राण्यांना निर्दयतेने वाहतुक प्रतीबंधक अधिनियम, सहकलम ५ (अ) (१) (९) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com