आडका ता .कामठी :- गावाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या “स्वप्नील शिला वसंत चांभारे प्रवेशद्वार” या भव्य प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर प्रवेशद्वार वसंतराव चांभारे यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सुमारे ७ लाख रुपये खर्च करून गावासाठी उभारण्याचा संकल्प केला असून, त्यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी बोलताना सरपंच विजय खोडके म्हणाले की, “गावाच्या विकासासाठी स्वतःच्या खिशातून इतका मोठा निधी देणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. वसंतराव यांचे गावावर असलेले प्रेम आणि आपुलकी यामुळेच हा उपक्रम शक्य झाला असून, त्यांच्या या कार्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी.”
कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच रत्नाकर देउळकर, सचीव उदय चांदुरकर व सदस्य राजेंद्र राऊत, दिपक चांभारे, प्रिया गोंडाणे, शिला काकडे, ज्योती चांभारे, सरिता गजभीये सर्व सदस्यगण उपस्थित होते.
तसेच नागरिकांमधून लटारू चांभारे, मुरलीधर चांभारे, नररत्न खोडके, महेंद्र खोडके, दिगंबर खोडके, नत्थू ठाकरे, संजय देउळकर, विष्णू नागमोत, पुरूषोत्तम मानमोडे, गंगाधर चांभारे मुरलीधर ठाकरे,रंगराव देऊळकर आदींची उपस्थिती होती.
याशिवाय छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, चे कार्यकर्ते स्वप्निल ठाकरे, विशाल मानमोडे, वेदांत काकडे, साहिल ठाकरे, शाम विलायकर अनिकेत चौधरी आयुष ठाकरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महिला मंडळींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.








