कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे फटाके फोडन्याच्या क्षुल्लक वादातून दोन भावंडांनी जख्मि तरुणावर चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना गतरात्री 2 वाजता घडली असून जख्मि तरुणाचे नाव आशिष परमानंद कांबळे वय 33 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे तर आरोपी चे नाव सुमित रतन रंगारी वय 20 वर्षे व कपिल रंगारी वय 21 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जख्मिच्या घरा शेजारी राहत असून आरोपी च्या आई चा वाढदिवस असल्याने उत्साहात घरासमोर फटाके फोडून वाढदिवस साजरा करीत असता जख्मि व आरोपीत झालेला हा क्षुल्लक वाद हा विकोपाला गेला व आरोपितानी सदर जख्मि ला चाकूने वार करून जख्मि केले.यासंदर्भात पोलिसांनी कायदेशीर रित्या गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







