spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीवर पुन्हा शोककळा; उज्जैनहून परतताना कारचा भीषण अपघातात कामठी च्या शुभम जैस्वाल सह नागपूर रहिवासी पारस कनोजिया चा मृत्यू

– रनाळा येथील तरुणाचा मृत्यू

– पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका

कामठी :- उज्जैन येथील खाटू श्याम बाबाचे दर्शन घेऊन वैष्णोदेवी ला जात असता राजस्थान येथे घडलेल्या कार अपघातात कामठी येथील वारीसपुरा रहिवासी पारसे कुटुंबियातील एकाच कुटुंबातील आई वडील व मुलगा या तीघांचा अपघाती मृत्यू होण्याची घटना 11 मार्च ला घडली असता या घटनेने संपूर्ण कामठीत शोककळा पसरली होती.या घटनेला विराम मिळून आठवडा लोटत नाही तोच काळाने घातलेल्या घालामुळे कामठीचे रनाळा परिसर पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले तर आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता उज्जैनहून परतणाऱ्या बैतुल व हरदा जिल्ह्याच्या सीमेवरील ढाकना गावाजवळील हरई क्षेत्रात कार चालकाची झोपेला डुलकी लागून नियंत्रण सुटल्या ने अनियंत्रित कार पुलाखाली उलटल्याने कार मधील मागच्या सीट वर बसलेले कामठी येथील रणाळा रहिवासी शुभम रंगीलाल उर्फ विजय जैस्वाल चा जागीच मृत्यू झाला तर समोरील सीट वर बसलेला नागपूर रहिवासी पारस कनोजियाचा उपचारादरम्यान भोपाल च्या रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच कामठी रहिवासी अमन जैस्वाल व नागपूर रहिवासी जतीन कनोजिया जख्मि आहेत. दुर्दैवाची पराकाष्ठा म्हणजे, आपल्या एकुलत्या एका आधारस्तंभाच्या निधनाची बातमी समजताच शुभमच्या वडिल विजय जैस्वाल यांना तीव्र हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मृतकाचे वडील धोक्याबाहेर आहेत .

दर्शनाहून परतताना काळाचा घाला

रनाळा येथील 28 वर्षीय शुभम जैस्वाल हा आपले मित्र अमन जयस्वाल वय 26 वर्षे रा कामठी जतिन कनोजिया वय 34 वर्षे रा नागपूर आणि पारस कनोजिया वय 35 वर्षे रा नागपूर यांच्यासोबत मंगळवारी रात्री ११ वाजता उज्जैन आणि नलखेडा येथील आई बगलामुखीच्या दर्शनासाठी निघाला होता. दर्शन घेऊन आनंदाने परतत असताना गुरुवारी सकाळी ८:३० च्या सुमारास बैतूल-हरदा सीमेजवळ ढाकना गावातील हरई क्षेत्रात चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्यांची कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. या भीषण अपघातात शुभम जैस्वाल चा जागीच मृत्यू झाला, तर इतर पारस कनोजिया चा उपचार दरम्यान मृत्यू झाला तसेच इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. घटना दरम्यान कार पुलाखाली उलटल्याने मागेहून येणाऱ्या ट्वेरा चालक अंकित तिवारी रा कल्याणपूर बैतुल ने मदतीची धाव घेत कार मधील सर्वाना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

वडिलांचा आधार हरपला

मृतक शुभम जैस्वाल हा अविवाहित होता आणि आपल्या वडिलांसोबत प्रॉपर्टीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करायचा. घराचा दिवा विझल्याची बातमी घरी पोहोचताच शुभमच्या वडीलाला मोठा धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते. एकाच वेळी कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण कामठी तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतक शुभम जैस्वाल च्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 11 वाजता कामठी येथील आजनी मार्गावरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Popular Articles