नागपुरातील नंदा कोलटकर यांना महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 2023 -24 चा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

0
53

नागपूर :- नागपुरातील ज्येष्ठ समाजसेविका नंदा कोल्हटकर यांना महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 2023 – 24 चा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी 17 मार्च 2020 रोजी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्त्री शिक्षण सामाजिक समता आणि महिला सबलीकरण आणि सक्षमता क्षेत्रात निरलस कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातून ११ महिलांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सेवावृत्तीचा वारसा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून 23 – 24 या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने नंदा कोल्हटकर यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत दादा पाटील (मंत्री उच्च व तंत्र शिक्षण) कार्यक्रमाचे मुख्य अतिथी छगन भुजबळ (मंत्री अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण) तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव गोपाल रेड्डी आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन आयोजन संचालक डॉ. अर्चना बोराडे यांनी तर डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या गौरव सोहळ्यात विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उच्च शैक्षणिक संचालक एसएनडीटी महिला विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. विलास नांदवळेकर उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.