नागपूर :- पाणी हे नैसर्गिक देण आहे त्यावर प्रत्येक प्राणी मात्रांचा अधिकार आहे हेच सिद्धान्त पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे चवदार तळ्याच्या पाण्याला आग लावून समतेचे बिगुल फुंकले नवा पर्वाची सुरुवात केली या स्मृती ला शंभर वर्षे सुरू होणार आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली म्हणून राज्य शासनाने पाणी कर मुक्त करून नैसर्गिक न्याय करावा असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते आज महाड सत्याग्रह स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रस्तुत अभियानाच्या प्रारंभ करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोजराज वैद्य हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे यांनी या प्रसंगी मार्मिक भाष्य केले प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्य यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तर सुरज ढोणे यांनी दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले आंरिमो चे प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे यांनी घोषणा केली राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे असे सांगितले. आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले तर या प्रसंगी ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते अभिषेक मिश्रा रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर यांनी सोबत बसुन चहा पाणी सोबत घेऊन ते आम्ही नाही हा संदेश देवून समतेचे प्रतिक आहोत हा संदेश दिला कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



