‘तरंगोत्सव २६” हा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम

0
40

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स) येथे मार्च २०२६ रोजी सांस्कृतिक क्लबतर्फे “तरंगोत्सव २६” हा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, एकल व समूह नृत्य, वाद्य संगीत तसेच काव्य सादरीकरणातून आपल्या कलागुणांची बहारदार उधळण केली. पारंपरिक व आधुनिक वेशभूषेमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली, तर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भारतीय संगीत व संस्कृतीचा गौरव करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टणकर, सांस्कृतिक क्लब प्रभारी डॉ. कृष्णा पडोले, विविध डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृतिक कार्यक्रमाला वोडीथला एज्युकेशन सोसायटी, हैदराबादचे सचिव व्ही. श्रीनिवास राव यांचे भरघोष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी प्रतिनिधी खुशी जीवतोडे, अमेय बोकडे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.