कामठी :- कामठी येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून शारीरिक संबंध स्थापित करणाऱ्या नराधम व या निर्दयी अमाननवीय कामात पीडितेची फूस लावून सहभाग घेत पीडितेस सदर कृत्यास बाधा पाडणाऱ्या महिला आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चे नाव चंदन मरई वय 27 वर्षे रा कामठी व 36 वर्षे महिला चा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही काल सायंकाळी घरात न दिसल्याने कामाहून घरी परतलेल्या पीडीत बालिकेच्या आईने सासूला विचारले असता आत्यासोबत शेजारच्या परिसरात जेवण करायला घेऊन गेल्याचे सांगितले रात्री 10 वाजूनही घरी न परतल्याने पीडितेच्या आई ने मोबाईल वर विचारपूस केली असता सत्य समोर आले तर जेवण करायला घेऊन जाणाऱ्या आरोपी महिलेने सदर आरोपी च्या पांढऱ्या गाडित बसवले त्यात आरोपीने पीडितेशी अश्लील वर्तन केले व आरोपी महिलेच्या घरी नेऊन गच्चीवर पीडित अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.यासंदर्भात फिर्यादि च्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 65(1),64 (2),493(5),सहकलम 4,6 ,8,17 पोकसो अधिनियम 2012 अँनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







