कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उनगाव रेती घाटावर काम करणाऱ्या मजुराच्या 14 वर्षीय मुलाचा ट्रेकटर टँकर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 4 वाजता घडली असून मृतक मुलाचे नाव अजय कलब मोवासीरा दीक्षित नगर बैतुल सध्या हल्ली मुक्काम उनगाव कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार उनगाव रेती घाटावर काम करण्यासाठी मागील तीन दिवसापूर्वी 12 मजूर कुटुंब परिवारासह मोलमजुरीसाठी कामठी तालुक्यातील उनगाव येथे आले असता नित्यनेमाने काम करीत असता घाटाच्या बाजूला वास्तव्यास असलेल्या झोपडीकडे मृतकाचे वडील दुपारी 4 वाजे दरम्यान घरी परतले असता मृतक मुलगा घरी न दिसल्याने चिंतातूर वडीलाने शोध घेतला असता सदर बालक ट्रेकटर जवळ ऑइल ने माखलेल्या मृतावस्थेत आढळला .हे दृश्य पाहुन सर्वाना एकच धक्का बसला. मृतकला कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टर ने बालकाला मृत घोषित केले.मृत्यू ट्रेकटर टँकर अपघातात झाल्याचे सांगण्यात येते.नवीन कामठी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय च्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतकाच्या पाठीमागे कुटुंबात आई वडील व एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.







