खापा बसस्थानकावर वॉटर फिल्टर, वॉटर कूलर, सौंदर्यीकरण करण्याची मागणी

0
29

खापा, वार्ताहर :- खापा बसस्थानक आणि नगर परिषद खापा यांच्या संयुक्त विद्यमाने मॉयल मॅगनीज खाण लिमिटेड, गुमगाव (खापा माईन) येथील खान प्रबंधक उमेश चरपे यांना प्रवाशांच्या मूलभूत सुविधांसंदर्भात निवेदन देण्यात आले. खापा बसस्थानकावर दररोज सुमारे १ हजार प्रवासी बाहेरगावाहून ये-जा करतात. या पार्श्वभूमीवर सीएसआर फंडातून बसस्थानकावर वॉटर फिल्टर, वॉटर कूलर मशीन बसविणे तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याप्रसंगी खाप्याचे नगराध्यक्ष पीयूष बुरडे, खापा बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक राजेंद्र धपके, राहुल निर्मल, आनंद मेनकदळे, चंद्रकांत लिखार आदी उपस्थित होते.