शेतकऱ्यांना आधार देणारा आणि महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेकडे नेणारा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

0
32

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- “महायुती सरकारने सादर केलेला यावर्षीचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो सामान्य माणसाच्या जगण्यात बदल घडवणारा आहे. शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी देऊन दिलेला मोठा आधार, एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेण्याचे धोरण आणि रस्ते-मेट्रोच्या जाळ्याद्वारे ग्रामीण व शहरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणारा हा अर्थसंकल्प राज्याला लवकरच ‘ट्रिलियन डॉलर्स’ची अर्थव्यवस्था बनवेल,” असा ठाम विश्वास भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

पंकज भोयर पालकमंत्री भंडारा जिल्हा यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचा विस्ताराने आढावा घेऊन त्यातील सर्व समाज घटकांसाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींची माहिती दिली ते म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत साध्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराला महाराष्ट्राची मोलाची साथ मिळावी या दृष्टीने या वर्षीच्या अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली आहे. शेती उ‌द्योग सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाचा मार्ग दाखविण्याबरोबरच या अर्थसंकल्पात सामान्य माणसाला सुशासनाची, गतिमान प्रशासनाची अनुभूती देण्यासाठीही दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारने दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून मोठा आधार दिला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी १० ते १५ पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी अॅग्रीस्टेंक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम यासारखे निर्णय शेतकऱ्याला गतिमान बाजारपेठेशी जोडण्यात मदत करणारे आहेत, असे यांनी नमूद केले.

पंकज भोयर पालकमंत्री भंडारा जिल्हा यांनी सांगितले की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार आहे. या योजनेसाठी सुमारे २० हजार कोटींची तरतूद महायुती सरकारने केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून १६ हजार मे.वॅ. ऊर्जाक्षमता निर्माण करण्यात येणार आहे. यातून १०० टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा होईल.

नदीजोड प्रकल्पातून शाश्वत विकास साध्य करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ९४.९६८ कोटी रु. तर दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी १३ हजार ४९७ कोटी, नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प ७४६५ कोटी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प २२१३ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २२४० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृष्णा खोन्यातील पुराचे पाणी भिमा खोन्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्‌यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्यात येणार असल्याचेही यांनी सांगितले.

शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राज्यातील मेट्रो नेटवर्क १२०० कि.मी. वर नेण्यात येणार आहे तसेच ६००० कि.मी. पेक्षा अधिकचे दुतगती मार्गाचे जाळे तयार करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो साठी ८, २२,८६२ कोटी, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो ११ २३,४८७ कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात खडकवासला स्वारगेट हडपसर–खराडी मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे ते शिरुर उन्नत मार्ग ५३ किमी. प्रकल्पासाठी ७५१४ कोटी रु. तर तळेगाव-चाकण उन्नतमार्ग २५ कि.मी. प्रकल्पासाठी ६ हजार ४९९ कोटी रु… चाकण-शिक्रापूर मार्गाच्या सहापदरीकरणा साठी ५ हजार २३२ कोटी रु… शिरुर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी १९२ कि.मी. १४,८८६ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे यातून शहरी भागातील प्रवास आणखी वेगवान होण्याबरोबरच शहरांतील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना ६२७२ कि.मी. दुतगती मार्ग, १४,९१९ कि.मी. चे राज्य आणि जिल्हा मार्ग तयार करणार यांनी सांगितले की एक हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉक्रिट रस्त्यांनी जोडण्यासाठी आशियाई बँकेच्या मदतीने ४५०० कोटींचा कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३ मध्ये २३ हजार कि.मी.ची कामे करणार (यापूर्वी टप्पा मध्ये ३० हजार कि.मी, टप्पा-२ मध्ये २४५० कि.मी.ची कामे पूर्ण), प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ४ लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणार, ५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या सर्व वस्त्या आणि ४२४७कि. मी. थे ‘पर्यटन परिरथ ने जोडणार यासारख्या निर्णयातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणार आहेत.

या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आशिष गोंडाणे, जिल्हा महामंत्री मयूर बीसेन, कल्याण निखाडे, भंडारा नगरपरिषद अध्यक्ष मधुरा मदनकर ,भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर ,चैतन्य उमाळकर, चंद्रकला भोपे, रुबी चड्डा आदी उपस्थित होते.