भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली

0
48

नागपूर :- दिनांक २३ मार्च रोजी शाहिद दिनानिमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नागपूर जिल्हा च्यावतीने शहीदे आझम भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. विजय टॉकीज चौका जवळ शहीद स्मारक जवळ, जिल्हा सचिव डॉ युगल रायलु, शहर सह सचिव कॉम. रविंद पराते, कॉम जयश्री चहांदे, कॉम. सुनील शेंडे, कॉम नसीम, कॉम धनराज करणूखे, कॉम. शरद पिंपळे, कॉम. मोहन बावणे आणि कॉम. इंद्रजीत खिची या वेळी उपस्थित होते.